माणसं ओळखण्यात मी नेहमीच चुकत असतो.
माणसं ओळखण्यात मी नेहमीच चुकत असतो
ज्यांचं माझ्यावर प्रेम नसतं त्यांनाच मी मित्र मनात असतो
आयुष्याच्या या एकटेपणाच्या वाटेत एक मित्र भेटला होता,
दोन शब्द मैत्रीचे बोलून मध्येच निघून गेला होता
त्याला फक्त तेवढीच वाट चालायची होती
वाटेत विरंगुळा म्हणून त्याला माझी साथ हवी होती
जो तो आपला स्वार्थ साधत असतो
मी मात्र असाच नेहमी फसत असतो
कारण... माणसं ओळखण्यात मी नेहमीच चुकत असतो.
Comments
Post a Comment