जीवन म्हणजे काय?

हसत हसत जगायचं असतं,

जगत जगत दुसऱ्याला हसवायचं असतं 
कारण हेच तर खरं जीवन असतं.



फुलत फुलत दरवलायचं असतं,
आपल्या सुगंधात दुसऱ्याला फुलवायचं असतं 
कारण हेच तर खरं जीवन असतं. 



फुलपाखरासारखे प्रत्येक क्षण जगायचं असतं,
प्रत्येक क्षणातच आयुष्य शोधायचं असतं 
कारण हेच तर खरं जीवन असतं.  


यशाच्या मखमलीबरोबर अपयशाच्या काट्यानवरूनही चालायचं असतं,
मध्येच ठेच लागली तर पुन्हा उठून उभं राहायचं असतं
कारण हेच तर खरं जीवन असतं. 
दुसऱ्यांच्या सुखात आपला सुख मानायचं असतं,
आपल्या दु:खातही सुख कोठे लपलंय का ?  ते शोधायचं असतं
अहो, का ? कारण हेच तर खरं जीवन असतं.

Comments

Popular posts from this blog

The Real Love

College