फणा
ओळखलस का मतदारा, मला? उन्हात आलं कोणी कपडे होते खादीचे, डोक्यावरती टोपी. घरात घुसला, छदमी हसला, बोलला दमदाटी देऊन, निवडणूक आली, मते हवीत, शिक्का मार नाव पाहून. मंदी, घोटाळे, काळ्या बाजारात चार दिवसांची तंगी, मोकळ्या हाती येऊ कसा, बाटली तेवढी आणली. चोरी केली, स्मग्लिंग केलं, सगळे धंदे केले, फिल्डिंग म्हणून गुत्तांमध्ये गुंड उभे केले. राजकारण्यांना घेवून संगे निवडणूक आता लढतो आहे, बाई, बाटली पैसे चारून मतदारांना फोडतो आहे. चेहऱ्यावर नाराजी पाहून बेरकी हसत उठला, मत हवं म्हणून यार आपलेपणा वाटला. मार खावून मोडलं कंबरड, तरी सोडला नाही ताठा, गळ्यावर्ती सुरी ठेवुनी नुसतं मत देतो म्हणा!